मुंबई,दि.६: Non-Bailable Warrant Against Sanjay Raut: शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) बजावले आहे. मुंबईतील पत्राचाळ कथित गैरव्यवहारप्रकरणी खासदार राऊत यांना सुमारे १०० दिवसांनंतर जामीन मिळाला आणि ते कारागृहातून बाहेर आले. यानंतर राऊत पुन्हा एकदा सक्रीय झाले. राऊत हे शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, यातच आता राऊत यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील कोर्टाने संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
अजामीनपात्र वॉरंट जारी… | Non-Bailable Warrant Against Sanjay Raut
मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. शिवडी कोर्टाने हे वॉरंट काढले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात कोर्टाने ही सुनावणी घेतली. शिवडी कोर्टात येत्या २४ जानेवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनवाणी होणार आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा | Sanjay Raut News
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा केलेला आहे. शिवडी दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर यासंदर्भातला खटला सुरु आहे. संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखात सोमय्या यांच्याविरोधात शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. १०० कोटींच्या या घोटाळ्याच्या आरोपामुळे आपली बदनामी झाली आहे, असा दावा मेधा सोमय्या यांनी केला होता.
दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्ररकणी संजय राऊतांचा ईडीमार्फतही तपास सुरु आहे. याच प्रकरणी १०० हून अधिक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांचा हा जामीन रद्द करण्यासाठी ईडीमार्फत आतापर्यंत चार वेळा खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली. मात्र जामीन रद्द झालेला नाही. न्यायाधीश नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर ईडीने याचिका दाखल केली होती. मात्र न्यायाधीश बोरकर हे उपस्थित नसल्यामुळे यासंबंधीची याचिका पुढे ढकलण्यात आली आहे.