Maharashtra News: अजुनही वेळ गेलेली नाही; दीपक केसरकर यांचे सूचक वक्तव्य

0

मुंबई,दि.२८: महाराष्ट्रातील (Maharashtra News) राजकीय संकट आता सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पाठवलेल्या अपात्र नोटिसीसंदर्भात उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. अजूनही शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होत आहेत.

त्यामुळे हा सत्तेचा खेळ अजुनही वाढणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रीया दिली. ‘अजुनही वेळ गेलेली नाही. भाजपसोबत सरकार स्थापन करा. आमच्याकडून एखादा शब्द दिला तर तो परत घेता येणार नाही, असं सूचक वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले आहे. (Maharashtra News)

‘आम्ही फ्लोअर टेस्टसाठी तयार आहोत. आम्ही आमचे म्हणणे मांडायला तयार आहोत. सध्या शब्दांचा खेळ करुन लोकांची मन भडकवण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आहे, त्याला उद्धव ठाकरेंनी मान द्यावा, असंही दिपक केसरकर म्हणाले. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पुन्हा विचार करावा असं मला वाटते. आपण आपली मुळची युती पुन्हा करावी असं आम्हाला वाटते, असंही केसरकर म्हणाले.

महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांसोबत चालले पाहिजे. आपल्याला कधीतर फ्लोअर टेस्टसाठी जावे लागेल. मी तळमळीने सांगतो माझ ऐका एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही, असंही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले. आम्हाला आता लोक गद्दार म्हटले जात आहे. आम्हाला प्रेत म्हटले जातात, आमची पोस्टर जाळली जातात, आम्हाला गद्दार म्हटले जाते. याच लोकांनी शिवसेना उभी केली आहे, असंही केसरकर म्हणाले.(Eknath Shinde Latest News)

गुलाबराव पाटलांनी शिवसेनेसाठी कित्येक केसेस अंगावर घेतल्या आहेत, त्यामुळे या लोकांना अस काही बोलू नका. वेळ निघून जायच्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा. अजुनही वेळ गेलेली नाही. भाजपसोबत सरकार स्थापन करा. आमच्याकडून एखादा शब्द दिला तर तो परत घेता येणार नाही असंह सूचक वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here