Hasan Mushrif ED Raids: ईडी छापेमारीनंतर आमदार हसन मुश्रीफ म्हणाले…

Hasan Mushrif ED Raids: सोमय्या यांच्यावर दीड कोटींचा फौजदारी दावे केला आहे

0

कोल्हापूर,दि.11: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif Ed Raids) यांच्या घरावर आज सकाळी सहा वाजेपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. मुश्रीफ यांच्या कागलमधील बंगल्यावर, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर आज ईडीकडून छापेमारी करण्यात आली. या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ (Hasan Mushrif News) यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली. मुश्रीफ यांनी कोणत्या कारणावरून कारवाई झाली हे माहीत नाही, किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) नव्याने तेच आरोप केलेत, कारखान्याशी आणि चंद्रकांत गायकवाड यांच्याशी काही संबंध नाही, असा दावा त्यांनी केला. सोमय्यांवर दीड कोटींचे फौजदारी दावे केलेत ते न्यायप्रविष्ठ असल्याचे ते म्हणाले.

काय म्हणाले हसन मुश्रीफ? | Hasan Mushrif ED Raids

हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, सोमय्या यांच्यावर दीड कोटींचा फौजदारी दावे केला आहे तो प्रलंबित आहे, आयकर विभागाचे छापे या आधीही पडले होते. सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर मी आधीच उत्तरे दिली होती. माझ्या कुटुंबावर छापे टाकले. ईडीची नोटीस, समन्स काहीच नाही. कारखान्याचे पैसे शेअर्स माध्यमातून उभा राहिला. पुण्यातील गायकवाड यांच्याशी व्यावसायिक भागीदारी नाही. ब्रिक्स कंपनी माझी असा दावा केला जातो पण त्यात तथ्य नाही. माझ्यावर सोमय्या यांनी आरोप केला काळा पैसा कारखाना आणि शेल कंपनी माध्यमातून गुंतवलं असं सांगितलं जातं, पण त्या आरोपात तथ्य नाही.

Hasan Mushrif ED Raids
हसन मुश्रीफ

कुटुंबिय भयभीत होत आहे | Hasan Mushrif News

ते पुढे म्हणाले, माझे जावई आणि ब्रिक्स कंपनी याचा काहीही संबंध नाही. ग्रामविकासाची काम रद्द केली गेली. आज झालेली छापेमारी कोणत्या मुद्दावर छापेमारी केली मला समजत नाही. कुटुंबाला त्रास नाहक होत आहे. कुटुंबिय भयभीत होत आहे. राजकारणासाठी अस केले जात आहे. ग्रामविकासाच्या कामाचं टेंडर त्यावेळेस रद्द केले. काही त्रूटी होत्या म्हणून केले. विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट केले जात आहे का? अशी शंका येते.

ईडीकडून नोटीस समन्स काहीच नाही | Maharashtra News

ते म्हणाले, आयकर विभागाचे छापे या आधी पडले होते. माझ्यावर सोमय्या यांनी आरोप केला, की काळा पैसा कारखाना शेल कंपनी माध्यमातून गुंतवला. कारखान्याचा पैसा शेअर्स माध्ययमातून उभा राहिला. गायकवाड यांच्याशी व्यावसायिक भागीदारी नाही. ब्रिक्स कंपनी माझी असल्याचा दावा केला जात आहे, पण त्यात तथ्य नाही. जावई आणि ब्रिक्स कंपनी संबंध नाही. ग्रामविकास काम टेंडर त्यावेळेस काही त्रूटी होत्या म्हणून रद्द केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here