मुंबई,दि.८: भाजपा खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा शिवसेना (शिंदे गट) युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटात युती होणार असल्याची चर्चा आहे. माजी आमदार तेली यांनी याला दुजोरा दिला आहे. यावरून राणेंना प्रश्न विचारण्यात आला, ‘राजन तेली कुठलाही नेता, कुठलाही पदाधिकारी नाहीये. मी मानत नाही. दोन माणसांना मी भाजपशी संबंधित मानत नाही. विशाल परब आणि राजन तेली. यांचं कोणतंही म्हणणं मी ग्राह्य धरणार नाही आणि याला विरोधच करेन.’ असे नारायण राणे म्हणाले.
नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी सिंधुदुर्गमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, अस झालं तर एकनाथ शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही संबंध तोडू.
“प्रतिष्ठित नागरिकांमध्ये स्वतः राजन तेली येत नाही. स्वतःला प्रतिष्ठा पाहिजे ना. सगळ्यांनी टाकून दिलेले एकनाथ शिंदे का जमा करतोय माहिती नाही. मी भेटल्यानंतर सांगेन. विशाल परब त्याचे ऑफिस कसं, कोणतीही मोठा नेता आहे असं. त्याने भाजपवर कमी टीका केलेली नाहीये ना? तो मला भेटू दे. कुठेही भेटू दे, त्याच्या ऑफिसमध्ये असला, तरी… तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. त्याला वाचवायला कोणीही येऊ दे”, अशी धमकी नारायण राणेंनी दिली.








