Maharashtra: वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक

0

मुंबई,दि.5: महाराष्ट्रातील (Maharashtra) वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची उद्या सोमवारी (दि.6) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. राज्यात काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईसह राज्यात रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि राज्य सरकार अलर्ट झालीय. मुंबई पालिकेने टेस्टिंग वाढवण्यासह मालाडमधील कोव्हिड सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले. राज्य सरकारची उद्या सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोना नियमावलीबाबत चर्चा होणार आहे. या बाबत झी 24 तास ने वृत्त दिले आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) एकाएकी झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याने एकूणच भितीचं वातावरण आहे. आतापर्यंत कोरोनामध्ये आपल्या सर्वांनाच मनाविरुद्ध या सर्व निर्बंधांचं पालण करावं लागलं. मात्र पुन्हा तशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासन सतर्क झाली आहे.

सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दररोज वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आणि नियमावली यावर चर्चा होणार असल्याचं समजतंय. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जातोय, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here