बीड,दि.9: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ‘फडणवीस तुम्ही नीट राहा. मराठ्यांनी अजूनही संयम सोडलेला नाही. मराठ्यांचा संयम सुटला तर आमदार वगैरे सोडून द्या. तुम्हालाही मराठे महाराष्ट्रात राहू देणार नाही.’ असे म्हणत जोरदार टीका केली आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा लक्ष्य केलं आहे. जरांगे सध्या बीड जिल्ह्यात घोंगडी बैठका घेत आहेत. मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले असून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे म्हणाले, निवडणुका जाहीर होताच आपल्याला बैठका घ्यायच्या आहेत. आहेत. मराठ्यांची हार होऊ देऊ नका. भाजपातील मराठा आता फडणवीसांपासून दूर चालला आहे. भाजपाच्या माजी आमदारांची रांग लागत आहेत. त्यांचे आमदार रात्रीच भेटायला येतात. भाजपाचा स्फोट तुम्हाला दिसेल, असा दावा त्यांनी केला. भाजपाच्या पुण्यातील एका नेत्यानं फ्लॅट विकला पण, त्याला तिकीट मिळणार नाही, असं म्हणतात, असं जरांगे म्हणाले.
मराठा काय करू शकतो हे फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे. जर आरक्षण दिले नाहीतर तुमची सत्ता घालवल्याशिवाय मराठे मागे हटणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस तुमचं नाव घेऊन बोलण्याची आमची इच्छा नाही. पण आमचा नाईलाज आहे. तुम्ही सत्तेवर बसला आहात म्हणून आम्हाला नाव घ्यावे लागत असले. नाहीतर तुमचे नाव शंभर पिढ्या तरी मराठे तोंडावर घेणार नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी हल्लाबोल केला.