Jayant Patil On Politics: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

0

सांगली,दि.31: Jayant Patil On Politics: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे 40 आमदार गेले आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी करता खंडपीठ नेमण्यात आले होते. सुनावणी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

जयंत पाटील यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण | Jayant Patil On Politics

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीबाबत मोठं विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आणि संबंधित आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तर शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परततील. आमदार उद्धव ठाकरेंकडे आल्यास भाजप नेतृत्वाला राष्ट्रपती राजवटीशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते सांगलीत बोलत होते.

कर्नाटक विधानसभा निवडणूक

राष्ट्रवादी कर्नाटक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? या प्रश्नाला देखील यावेळी जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याबाबतचा निर्णय शरद पवार आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते घेतील. मी एक छोटा कार्यकर्ता असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here