Maharashtra HSC Result 2023: बारावीचा निकाल लागला, ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

0

मुंबई,दि.२५: Maharashtra HSC Result 2023: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज गुरुवारी (दि.२५) दुपारी दाेन वाजल्यापासून ऑनलाइन जाहीर होणार आहे. दरम्यान शि७ण विभागाने जाहीर करुन निकाला संदर्भातमाहिती दिली आहे.

यंदा राज्यात निकाल ९१.२५ टक्के लागला असून १२ लाखाहूनही अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 96.01 तर सर्वात कमी निकाल मुंबई 88.13 टक्के लागला आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. 

Maharashtra HSC Result 2023

येथे पहा निकाल http://hscresult.mkcl.org

http://mahresult.nic.in

१४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या निकालाची ९१.२५ टक्के एवढा आहे. कोकण विभाग अग्रेसर असून सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के तर  सर्वात कमी निकाल  मुंबई ८८.१३ टक्के  एवढा आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३  टक्के असून मुलांचा निकाल ८९.१४ टक्के एवढा आहे.मुलांपेक्षा ४.५९ टक्के जास्त आहे.

ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने (http://verification.mhe hsc.ac.in) या संकेतस्थळावरून स्वत: तसेच कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची साेय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी,शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र त्यांच्या शाळा महाविद्यालयामार्फत ५ जून पासून दुपारी तीन नंतर वितरित करण्यात येतील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here