Maharashtra HSC Result 2022: बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर, असा पहा निकाल

1

दि.७: Maharashtra HSC Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच बारावीचा निकाल बुधवारी ८ जून २०२२ रोजी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारांनी निकालासंबंधित सर्व नवीन माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट तपासत रहावे.

महाराष्ट्र एचएससी निकाल १० जून २०२२ रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध होणार असे अपेक्षित होते. परंतु निकाल उद्या ८ जून रोजी जाहीर केले जाणार असल्याचे बोर्डाकडून अधिकृत अधिसूचना जारी केले गेले आहे.

असा पहा निकाल:

http://hscresult.mkcl.org

http://msbshse.co.in

http://hscresult.mkcl.org

http://mahresult.nic.in

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट http://maharesult.nic.in किंवा http://hscresult.mkcl.org किंवा http://msbshse.co.in वर जा.

होमपेजवर, MSBSHSE १२वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.

तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा.

तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.

कोरोना महामारीमुळे यंदा विद्यार्थ्यांनी घरातून शिक्षण घेतले. ऑनलाईन क्लासच्या उपस्थितीत गतवर्षी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला होता. मात्र, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यामुळे, यंदाच्या निकालाची विद्यार्थ्यांना अधिकची उत्सुकता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओ ट्विट करुन बारावीच्या निकालासंदर्भात माहिती दिली आहे. ”महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल,” असं ट्विट त्यांनी केलंय.


1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here