Maharashtra HSC Board Result 2024: बारावीचा निकाल 93.37 टक्के एवढा लागला

0

मुंबई,दि.21: Maharashtra HSC Board Result 2024: बारावीचा निकाल 93.37 टक्के एवढा लागला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं मंगळवार, दिनांक 21 मे 2024 रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. शिक्षण मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेला हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल मंगळवारी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला. 

महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीनं इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानुसार अधिकृत आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत निकालात 2.12 टक्क्यांची वाढ झाली. 0 टक्के निकाल लागलेल्या संस्था / महाविद्यालयांची संख्या 21, तर 100 टक्के निकाल लागलेली महाविद्यालयांची संख्या 2246 इतकी असल्याचं शिक्षम मंडळाकडून जाहीर करण्यात आलं. 

येथे पाहा निकालMaharashtra HSC Board Result 2024

http://mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

http://mahahsscboard.in


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here