महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने, हॉटेल्स आता…

0
Devendra Fadnavis

मुंबई,दि.२: Maharashtra Government On Hotels Shops: महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दुकाने, हॉटेल्स आता 24 तास सुरू राहतील. फडणवीस सरकारने व्यापारी आणि नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता दुकानं, हॉटेल्स आणि इतर अस्थापना  24 तास उघडी ठेवता येणार आहेत. मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार  वगळून इतर सर्व आस्थापना ,खाद्यगृहं, आणि दुकाने आता 24 तास सुरू राहणार आहेत. राज्य सरकारच्या उद्योग विभागातर्फे शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून अनेकदा रात्री हॅाटेल्स आणि दुकाने उशिरा सुरू ठेवण्यास मनाई करण्यात येत होती. महाराष्ट्र शासनाने दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, मद्य विक्री आणि पुरवठा करणाऱ्या आस्थापनांवरील वेळेचे निर्बंध कायम ठेवताना इतर आस्थापना 24 तास खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या आस्थापनांवर निर्बंध | Maharashtra Government On Hotels Shops

19 डिसेंबर 2017 च्या अधिसूचनेनुसार डान्स बार, परमिट रूम, बिअर बार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक्स आणि मद्य विक्री करणारी दुकाने उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. 31 जानेवारी 2020 च्या सुधारित अधिसूचनेने थिएटर आणि सिनेमागृहांना यातून वगळण्यात आले, पण मद्यविक्री संबंधित आस्थापनांवरील वेळेचे बंधन कायम ठेवण्यात आले होते. तेच निर्बंध पुढेही कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ही आस्थापने 24 तास सुरू ठेवता येणार नाहीत.

कर्मचाऱ्यांना सुटी देणे बंधनकारक 

अधिनियमाच्या कलम 16 (1) (ख) नुसार, मद्य विक्री वगळता इतर आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस 24 तास सुरू ठेवता येतील, परंतु कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला सलग 24 तासांची साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक आहे. यामुळे रेस्टॉरंट्स, दुकाने, व्यापारी संकुले यांना व्यवसायाच्या संधी वाढतील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here