Maharashtra Exit Poll: एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळणार इतक्या जागा

0

सोलापूर,दि.1: Maharashtra Exit Poll: आज (दि.1) सातव्या टप्प्यातील मतदानासह लोकसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून एक्झिट पोल जाहीर होऊ लागले. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. निकालापूर्वी विविध माध्यम वाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी आज संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केले. देशात कोणता पक्ष सरकार स्थापन करू शकतो? कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? कोणत्या मतदानात यासाठी कोणते अंदाज बांधले गेले?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या 48 जागांचा समावेश असून मतदार महायुतीला कौल देणार की महाविकास आघाडीला हे पाहावं लागणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर होणारी ही पहिली मोठी निवडणूक असल्याने महाराष्ट्राची जनता काय कौल देते हे औत्सुक्याचं आहे.

टीव्ही 9 -पोलस्ट्रॅट एक्झिट पोल | Maharashtra Exit Poll

टीव्ही 9 -पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी 23 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे. तर इतरांना 1 जागा मिळेल.

भाजपाला 18, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. तर मविआत काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14, पवार गटाला 6 जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे.

एबीपी-सी वोटर एक्झिट पोल

एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 24 जागा मिळतील. यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 6, भाजपाला 17, अजित पवारांना 1 जागा असेल. तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना 9, शरद पवारांना 6 आणि काँग्रेसला 8 अशा 23 जागा मिळतील. 1 जागा इतरांना मिळेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here