मुंबई,दि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्णी या गावातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे. 923 मतदारांनी गावातील प्रश्नासाठी मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगण्यात आले आहे.
सोलापूर – 29.44
अहमदनगर – 32.90
अकोला – 29.87
अमरावती – 31.32
औरंगाबाद – 33.89
बीड – 32.58
भंडारा – 35.06
बुलढाणा – 32.91
चंद्रपूर – 35.54
धुळे – 34.05
गडचिरोली – 50.89
गोंदिया – 40.46
हिंगोली – 35.97
जळगाव – 27.88
जालना – 36.42
कोल्हापूर – 38.56
लातूर – 33.27
मुंबई शहर – 27.73
मुंबई उपनगर – 30.43
नागपूर – 31.65
नांदेड – 28.15
नंदूरबार – 37.40
नाशिक – 32.30
उस्मानाबाद – 31.75
पालघर – 33.40
परभणी – 33.12
पुणे – 29.03
रायगड – 34.83
रत्नागिरी – 38.52
सांगली – 33.50
सातारा – 34.78
सिंधुदुर्ग – 38.34
ठाणे – 28.35
वर्धा – 34.55
वाशिम – 29.31
यवतमाळ – 34.10