मुंबई,दि.17: Election Opinion Poll: केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) जम्मू-काश्मीर आणि हरियाणासह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आता राज्यात नियोजित वेळेवर म्हणजेच दिवाळीला निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात विधानसभा निवडणुकीबाबतचा पहिला ओपिनियन पोल समोर आला आहे. यात महायुती आणि महाविकास आघाडी या घटक पक्षांना किती जागा मिळू शकतात? याचा अंदाज आला आहे.
टाईम्स नाऊ नवभारत आणि मॅट्रीझने त्यांच्या सर्वेक्षणात सर्व पक्षांच्या मतांच्या टक्केवारीचा अंदाज लावला आहे. ओपिनियन पोलमध्ये विचारण्यात आले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाबद्दल तुमचे मत काय आहे? प्रतिसादात 35 टक्के लोकांनी काम खूप चांगले असल्याचे सांगितले. 21 टक्के लोकांनी त्याचे काम सरासरी मानले. 30 टक्के लोकांनी त्यांचे काम अजिबात चांगले नसल्याचे म्हटले आहे. 14 टक्के लोकांनी टिप्पणी केली नाही आणि सांगितले की त्यांना माहित नाही.
टाईम्स नाऊ नवभारत-मटेराइज ओपिनियन पोल
एकूण जागा: 288, बहुमत-145
पार्टी | जागा |
भाजप | 95-105 |
शिवसेना (शिंदे) | 19-24 |
राष्ट्रवादी (अजित पवार) | 7-12 |
काँग्रेस | 42-47 |
शिवसेना (उद्धव ठाकरे) | 26-31 |
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) | 23-28 |
इतर | 11-16 |