Devendra Fadnavis: सकाळच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Devendra Fadnavis: पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला आणि दुसरा...

0

मुंबई,दि.13: Devendra Fadnavis On Politics: अजित पवारांसोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 मध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी पहाटे सरकार स्थापन केले होते. हे सरकार फक्त काही तासच चालले होते, यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘2019 मध्ये आम्ही घेतलेल्या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना माहिती होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळाच खळबळ उडाली आहे. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? | Devendra Fadnavis On Politics

वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ‘2019 मध्ये आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. या सरकार संदर्भात सर्व चर्चा झाल्या होत्या. पण, ऐनवेळेला आमच्यासोबत विश्वासघात करण्यात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला आणि दुसरा विश्वासघात पवारांनी केला असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.   

शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया | Sharad Pawar On Devendra Fadnavis

‘मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची स्टेटमेंट्स करतील, असं मला कधी वाटलं नाही’, असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला आहे.

आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली

‘आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, म्हणून आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही. शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला. पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता. हा छोटा होता,’ असं फडणवीस म्हणाले.

‘अजितदादांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीच्या नाही तर प्रामाणिक भावनेतून घेतली होती. पण नंतर ते कसे तोंडघाशी पडले हे अजितदादा सांगतील, त्यांनी नाही सांगितलं तर मी सांगीन,’ असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here