मुंबई,दि.21: Maharashtra Covid: जगभरातील वाढता कोरोना संसर्ग (Coronavirus Outbreak) पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये (China) कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या वाढत आहे. महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आता कोरोना नमुन्यांच्या जीनोम सीक्वेन्सिंग (Genome Sequencing) करणार आहे. Maharashtra Covid News: A big decision of the state government in view of the increasing corona infection around the world
महाराष्ट्र सरकारने घेतला निर्णय | Maharashtra Covid News
केंद्र सरकारच्या (Central Government) सूचनेनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. जगभरातील वाढता कोरोना संसर्ग (Coronavirus Outbreak) पाहता केंद्रांने राज्यांना जीनोम सीक्वेंसिंग करण्याच्या मार्गदर्शन सूचना केल्या होत्या. या सूचना गांभीर्याने घेत राज्य सरकारने नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेतला असून नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे (Maharashtra Covid News Today)
राज्य सरकारचा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय | Maharashtra Covid
एकीकडे जगभरात कोरोना रुग्णांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दुसरीकडे भारतातील कोरोनाची परिस्थिती सामान्य आहे. असं असलं तरी भारत सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जीनोम सीक्वेन्सिंगबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांचे सर्व नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवू
महाराष्ट्र आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजय खंदारे (Sanjay Khandare) यांनी सांगितलं आहे की, ‘केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार, राज्यातील कोरोना (Sample of Corona Patients) रुग्णांचे सर्व नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी (Genome Sequencing) मुंबई आणि पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवणार आहेत. सध्या, राज्यात सुमारे 100 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, त्यामुळे आम्ही सर्व पॉझिटिव्ह नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवू.’
भारत सरकारची खबरदारी
जगभराचं टेन्शन वाढवणाऱ्या कोरोनामुळे भारत सरकारने खबरदारीचे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कोरोना संदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये देशातील आणि जगातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.
जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ | Coronavirus Outbreak
जगभरात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे. गेल्या आठवड्यात जगात 36 लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचं संकट फार गंभीर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दररोज अनेक जणांचा मृत्यू होत असून मृतदेहांचा खच पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून औषधे आणि खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली केली.