Maharashtra Budget 2023: बजेटमधून घोषणांचा पाऊस, शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

0

मुंबई,दि.9: Maharashtra Budget 2023: राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषी क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस पाडल्याचं दिसून येतंय. कृषी क्षेत्रासाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या असून त्यामध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, महाकृषीविकास अभियान, एक रुपयात पीक विमा योजना आणि केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त 6000 रुपये देणार असल्याची घोषणा केली.

राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात झाली असून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात शेतकऱ्यांपासून केली आहे. यामध्ये राज्य सरकारकडून केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे. तसेच शेतीसाठी विविथध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी दिले जाणार आहेत. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here