महाराष्ट्र: गृह विभागाचा राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मोठा निर्णय

0

मुंबई,दि.१८: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यात यावे अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करायला हवे असेही राज ठाकरे म्हणाले होते. आमचा प्रार्थनेला विरोध नाही असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी यांनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवावे असा इशारा दिला आहे. त्यासाठी सरकारने मौलवींशी चर्चा करावी असंही राज ठाकरेंनी सांगितले होते. त्यानंतर आता राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बेकायदेशीर भोंगे हटवण्याबाबत गृह विभागाने सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पोलीस महासंचालक बैठक घेणार आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांच्यातही बैठक होणार आहे.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार सर्वधर्मीय सलोखा ठेवणे हा पोलिसांचा हेतू आहे. कुणालाही भोंगे अथवा स्पीकर लावायचे असतील तर त्यांना स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे असा निर्णय गृह खात्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस महासंचालकांच्या बैठकीला सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची उपस्थिती राहणार आहे. कायद्याचे पालन सर्वांसाठी आहे. त्यामुळे कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही बैठक आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर गृह विभाग सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे.

तत्पूर्वी नाशिक पोलिसांनी भोंग्यांबाबत नोटीस जारी केले आहे. नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडेय म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी आदेश जारी केले आहे. सर्व धार्मिकस्थळावरील भोंगे, स्पीकरची परवानगी घेणं बंधनकारक आहे. ३ मेनंतर बेकायदेशीर भोंगे हटवण्यात येतील. जर कुणाला हनुमान चालीसा पठण करायचं असेल तर ते मशिदीपासून १०० मीटर अंतरावर आणि दोन्ही एकाचवेळी वाजवू नये. अजानपूर्वी किंवा नंतर १५ मिनिटांनी हनुमान चालीसा लावली तरी हरकत नाही. कुणीही बेकायदेशीर भोंगे लावले तर ४ मेपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करून भोंगे जप्त करण्यात येतील. जो कोणी बेकायदेशीर भोंगे लावेल त्यांना ४ महिने ते १ वर्ष कारावास भोगावा लागू शकतो. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here