maharashtra: भाजपला पराभूत करण्यासाठी AIMIM पक्षाचा मोठा निर्णय

0

औरंगाबाद,दि.19: maharashtra: नुकतेच पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका (assembly elections 2022) झाल्या. चार राज्यात भाजपाने (bjp) सत्ता कायम ठेवली आहे. भाजपाचे प्राबल्य दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रात सर्व विरोधक एकवटले आहेत. औरंगाबादमध्ये AIMIMचे खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्यात एक बैठक झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या बैठकीत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वपक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली असल्याचंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. आहेत.

इम्तियाज जलिल यांनी म्हटलं, हे खरं आहे की ते भेटायला आले होते. माझ्या आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी ते आले होते. त्यावेळी आमच्यात चर्चा सुरू होती. आमच्यावर आरोप होतात की, भाजप जिंकते ते आमच्यामुळे जिंकते. तर मी त्यांना ऑफर दिली की, जर तुम्हाला हे संपुष्टात आणायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? पण त्यावर ते काही बोलले नाहीत. कुणालाही आम्ही नकोयत. फक्त मुस्लिमांची मते पाहिजेत. काँग्रेस, राष्ट्रवादीलाही मुस्लिम मते हवी आहेत ना या मग आमच्यासोबत. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्तियाज जलिल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा viral video: शांतपणे कोपऱ्यात उभे असलेल्या बैलाला माणसाने मारली काठी पुढे बैलाने

या देशात सर्वात जास्त नुकसान जर कोण करत असेल तर ते भाजप आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी आम्ही तयार आहोत. उत्तरप्रदेशात सुद्धा समाजवादी पार्टी आणि बसपा सोबत बोलणं केलं होतं. पण त्यांना मतं हवी आहेत आणि ओवैसी साहेब नकोयत, एमआयएम पक्ष नकोय. म्हणून मी त्यांना ऑफर दिली की, चला आपण दोघेही एकत्र येऊन निवडणूक लढवूया असंही इम्तियाज जलिल म्हणाले.

राजेश टोपेंना जलील यांची विनंती

मी त्यांना ऑफर दिली आहे. माझ्या ऑफरनंतर ते शांत बसले. आता त्यांचे वरिष्ठ नेते त्याबाबत काय बोलतात ते समोर आल्यावर बसू आणि विचार करु. नाहीतर आमची एकला चलो रे ची तयारी आहेच. त्यांनी कमीत कमी शरद पवारांना सांगावे की एमआयएम महाविकास आघाडीसोबत एकत्र येण्यास तयार आहे असंही इम्तियाज जलिल यांनी म्हटलं.

भाजपला हरवण्यासाठी एकत्र यायला हवं, राष्ट्रवादी काँग्रेसने ही बाब गांभीर्याने घ्यावी असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं आहे. आता एमआयएमच्या या ऑफरवर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पहावं लागेल.

महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल भागात एमआयएमची ताकद प्रचंड असल्याचं पहायला मिळतं. वंचित आघाडीसोबतचा प्रयोग फेल गेल्यावर आता एमआयएमची महाविकास आघाडीसोबत एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आल्याचं बोललं जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here