Amol Mitkari On Raj Thackeray: ‘…तर राज ठाकरे यांचे 15 चे 50 आमदार झाले असते’ आमदार अमोल मिटकरी

0

नागपूर,दि.3: Amol Mitkari On Raj Thackeray: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नुसतं भाषण देऊन झालं असतं तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री झाले असते. त्यांचे 15 चे 50 आमदार झाले असते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे दोन दिवसीय शिबीर नागपुरात होत आहे. त्याचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अमोल मिटकरी यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांवर टीका केली.

‘.::.तर राज ठाकरे यांचे 15 चे 50 आमदार झाले असते | Amol Mitkari On Raj Thackeray

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. मिटकरी म्हणाले, नुसतं भाषण देऊन झालं असतं तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री झाले असते. त्यांचे 15 चे 50 आमदार झाले असते. अजित पवार यांना विनंती आहे की आमच्या मित्र पक्षातील काही वाचळविरांना आवरा नाही तर आपल्या पक्षात देखील बोलणारे लोक आहेत. मोदींनी नवीन संसदेचे उद्घाटन केलं म्हणून ते पुन्हा पंतप्रधान होतील हे सांगता येत नाही. 72 वर्षानंतर आरएसएस पद देत नाही मोदींचे वय 73 वर्ष आहे. मोदी थकले हे दाखविण्यासाठी यूपी मध्ये एन्काउंटर करून नव्या दमाचे नेतृत्व दाखवलं असल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे.

राष्ट्रवादी पक्षात भाषण देणारा आमदार होतो पण… | Amol Mitkari

राष्ट्रवादी पक्षात भाषण देणारा आमदार होतो. पण भाजपमध्ये खोटं बोलणारा पंतप्रधान होतो. खोटं हिंदुत्व ओबीसींवर लादण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. शिवाजी महाराजांचे राज्य मराठा भोसले यांसाठी नाही तर स्वराज्य होते, बलुतेदार सुखाने जगत होते. शिवाजी महाराजांचे हिंदू राष्ट्र हेच आमचं ध्येय असल्याचं मोहन भागवत सांगतात. थुंकणे ही आमची संस्कृती होती, अस सांगितल जातं. आमची लढाई मंदिर मस्जिदसाठी नाही तर आमची लढाई सत्तापिपासू लोकांशी आहे जे माणसं मारत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

या आधीच्या रेल्वे मंत्र्यांनी अपघात झाल्यास नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला. ज्याच्याकडे नैतिकता आहे तोच राजीनामा देतो, असं म्हणत भाजपच्या रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मिटकरी यांनी केली. खारगरमध्ये ओबीसी लोकांना मारलं, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. सँगोल म्हणजे तुमच्यावर धर्माचा अंकुश राहील. सम्राट अशोक यांचं चिन्ह बदलविण्यासाठी सँगोल आणलं असल्याचं मिटकरी म्हणाले. संसदेत पुजारी आणायला विमान जातं आणि पुलवामामध्ये 40 जवानांना विमान मिळालं नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here