Ajit Pawar: ‘रामदेव बाबाने सांगितले नखाला नख घासा, मी केलं पण माझी सर्व…’ अजित पवार

Ajit Pawar: अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत

0

अहमदनगर,दि.६: राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी रामदेव बाबांचा (Ramdev Baba) किस्सा सांगताच सभेत हशा पिकला. अजित पवार हे आपल्या बेधडक बोलण्याच्या शैलीकरिता परिचित आहेत. पवारांची फटकेबाजी अनेकांना परिचित आहे. अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. एखादं वक्तव्य करताना ते ठामपणे करतात किंवा त्याच्या परिणामांची चिंता करत नाहीत. जाहीर सभांमध्ये तर ते असे काही विनोदी वक्तव्य करतात, ज्यामुळे अनेकदा सभेत उपस्थित लोकांची हसून हसून पुरे वाट होते. आज अहमदनगर येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी बुवाबाजीवर असेच एक बिनधास्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे उपस्थित सर्वांनाच हसू अनावर झाले. लांब केस हे सर्वांच्याच आवडीचा विषय असतो. अजित पवार यांनी अनेकदा स्वतःच्या केसांवर विनोद केलेला आहे. यावेळी त्यांनी रामदेव बाबांचे नाव घेत पुन्हा एकदा विनोद केला.

रामदेव बाबाने सांगितले नखाला नख घासा मी केलं पण माझी… | Ajit Pawar

“तुम्ही नखाला नख कशाला घासता, ते रामदेव बाबाने सांगितले म्हणून करता. रामदेव बाबाने सांगितले नखाला नख घास. मी केलं पण माझी सर्व केसं गेली. नवीन केस यायचं तर नावाच नाही. या बुवा लोकांचं काही ऐकू नका. साधू संताचं ऐका, महापुरुषांचं ऐका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले यांनी सांगितलेले विचार ऐका. मौलाना आझाद असतील शाहू-फुले-आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील या सर्व महान लोकांचे ऐका. पण बुवाबाजी करणाऱ्यांचे ऐकू नका. नखाला नख घासून तिसरंच काहीतरी व्हायचं. डॉक्टरकडं जावं लागेल. डॉक्टर म्हणेल, हे कुणी करायला लावलं. पुन्हा डॉक्टरचा खर्च करावा लागेल.”, अजित पवारांनी हा किस्सा सभेत सांगताच कुणालाच हसू आवरले नाही.

शरद पवारांनी केला इंदोरीकर महाराज यांचा उल्लेख

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील काल पुणे येथे बोलत असताना इंदोरीकर महाराज यांचा उल्लेख केला होता. ज्यामुळे उपस्थित लोकांमध्ये हशा पिकला. ते म्हणाले, “एक जण माणसात सहजपणानं चांगले संस्कार कसे करता येईल, हे चांगलं काम निवृत्ती महाराज करतात. त्याचबरोबर, आज मला त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली नाही. पण, मी त्याचा लाभ पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही, मी एवढाच इशारा त्यांना देऊ इच्छितो”, असे शरद पवार यांनी म्हणताच कार्यक्रमात उपस्थित लोक पोट धरून हसू लागले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here