Home महाराष्ट्र वीज पुरवठा खंडित झाल्यास या टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार 

वीज पुरवठा खंडित झाल्यास या टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार 

0

बारामती,दि.1: वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीजबिलाबाबत तक्रार असल्यास आता वीज कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वरिष्ठांना वैयक्तिक फोन लावून वेळ वाया घालवू नका. महावितरणने ग्राहकांसाठी 24 तास कार्यरत असणारी मध्यवर्ती तक्रार प्रणाली कार्यान्वित केली असून, टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवणे अधिक फायदेशीर आणि सुरक्षित असल्याचे आवाहन केले आहे.

वैयक्तिक फोन का टाळावेत?

महावितरणच्या मते, जेव्हा एखाद्या भागाची वीज जाते, तेव्हा कर्मचाऱ्यांना एकाच वेळी शेकडो फोन येतात. यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ माहिती घेण्यातच जातो आणि प्रत्यक्ष फॉल्ट दुरुस्त करण्यास उशीर होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खांबावर किंवा वीज वाहिनीवर काम करताना फोन घेतल्यास कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, वैयक्तिक फोनवर केलेल्या तक्रारींची अधिकृत नोंद होत नसल्याने त्या सोडवण्यास तांत्रिक अडचणी येतात.

तक्रार नोंदवण्याचे अधिकृत मार्ग:

1. टोल फ्री क्रमांक: 1912, 18002333435 किंवा 18002123435 यावर संपर्क साधा.

2. मिस कॉल: नोंदणीकृत मोबाईलवरून 022-50897100 वर मिस कॉल द्या.

3. SMS सुविधा: मोबाईलवर “NOPOWER <12 अंकी ग्राहक क्रमांक>” टाईप करून 9930399303 वर पाठवा.

4. डिजिटल प्लॅटफॉर्म: महावितरणचे मोबाईल ॲप किंवा http://www.mahadiscom.in या संकेतस्थळाचा वापर करा.

तक्रार नोंदवताना ‘ग्राहक क्रमांक’ महत्त्वाचा!

तक्रार नोंदवताना आपला 12 अंकी ग्राहक क्रमांक दिल्यास यंत्रणेला नेमका फॉल्ट शोधणे सोपे जाते. ऑनलाईन तक्रार नोंदवल्यास ती थेट संबंधित शाखेकडे वर्ग होते आणि वीज नियामक आयोगाच्या नियमांनुसार ती वेळेत सोडवणे महावितरणला बंधनकारक असते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.