Maha-Politics: अजित पवारांचा सासवड दौरा रद्द आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा अचानक दिल्ली दौरा

0

मुंबई,दि.17: Maha-Politics: अजित पवारांचा सासवड दौरा रद्द आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा अचानक दिल्ली दौरा यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अलीकडच्या काळात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आज अजित पवार यांनी आपला सासवडमधील कार्यक्रम अचानक रद्द केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार हे सासवडमध्ये शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार होते, मात्र त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मात्र या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.

अजित पवार यांचा दौरा रद्द | Maha-Politics

एकीकडे अजित पवार यांचे सासवडमधील सर्व कार्यक्रम अचानक रद्द झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) दिल्लीला पोहोचले आहेत. बावनकुळेंचा अचानक दिल्ली दौरा आणि दुसरीकडे अजित पवार यांनी सासवडमधील सर्व कार्यक्रम स्थगित केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या…

दरम्यान एकीकडे अजित पवार हे भाजपवर नाराज असून, ते भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नागपूरमध्ये काल झालेल्या सभेत देखील अजित पवार बोलले नाहीत, त्यामुळे चर्चेला आणखीनच उधाण आलं. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार नाराज नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवार अजिबात नारज नाहीत, छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची जी सभा झाली त्या सभेत जयंत पाटील बोलले नाहीत मग ते नाराज होते असं म्हणायचं का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मविआच्या प्रत्येक सभेत दोनच जण बोलणार हे आधीपासूनच ठरलं होतं. यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या सर्व आफवा आहेत. ज्या झाडाला आंबे त्याच झाडाला लोक दगड मारतात. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील अजित पवार हे भाजपसोबत जातील असं वाटत नसल्याचं म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here