Magic Video: जादूगाराची जादू पाहून सर्वच अवाक

Magic Video: जादू पाहून लोक म्हणतात हे कसं घडलं?

0

नवी दिल्ली,दि.4: Magic Video: जादू (Magic) पाहणे अनेकांना आवडते. अनेकजण जादूचे प्रयोग करून दाखवतात. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. लहान मुले असोत किंवा मोठी माणसं… जादूचा खेळ असा आहे की जो प्रत्येकाला मोठ्या आवडीने पाहायला आवडतो. जादुगार कुठलाही चमत्कार दाखवत नसून तो केवळ हातचलाखी करत असतो.

पण तो या सर्व गोष्टी इतक्या वेगाने करतो की, लोकांचे मनोरंजन तर होतेच, पण त्यासोबतच या जादूगाराने हे कसे केले, असा विचार करायलाही लोकांना भाग पाडले जाते. सध्या सोशल मीडियावर असाच काही व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये जादूगाराची जादू पाहून सर्वच अवाक झाले आहेत. (Viral Video)

हेही वाचा Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर टीका करताना जीभ घसरली

जादूगार असे काही करून दाखवतो की… | Magic Video

रेस्टॉरंटमध्ये बसलेली एक महिला तिच्या ऑर्डरची वाट पाहत आहे. तेव्हा एक जादूगार तिच्याकडे येतो आणि तिला जादू पाहायला सांगतो. यावर महिलाही तयार होते. पण पुढच्याच क्षणी जादूगार असे काही दाखवतो की ती महिला थोड्या वेळासाठी थक्क होऊन जाते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता, जादूगाराने हे कसे केले यावर महिलेचा विश्वास बसत नाही. 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल | Viral Video

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जादूगार टेबलावर पडलेली रिकामी प्लेट आधी एका काळ्या कपड्याने झाकतो. यानंतर कापड काढताच ताटात अन्न येते. आता ते कसे करतो, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या या जादूची तुफान चर्चा रंगली आहे. 

ट्विटरवर @NextSkillslevel या हँडलद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये डिनर अँड शो असं लिहिलं आहे. 9 सेकंदाच्या या व्हिडिओमुळे इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगली आहे. व्हायरल क्लिप आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here