Loudspeaker Row: राज्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, पहिल्यांदाच मालेगावात भोंग्याविना अजान

0

मुंबई,दि.४: Loudspeaker Row: राज्यात भोंग्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पाडवा मेळाव्यातील सभेत मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पाठोपाठ झालेल्या ठाणे आणि औरंगाबाद सभेतही राज ठाकरे यांनी हाच मुद्दा लावून धरत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मेपर्यंतचे अल्टिमेटम दिले होते. यानंतरही कारवाई झाली नाही, तर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. मात्र, आता राज ठाकरे यांच्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. शिराळा कोर्टात राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी नोटीस बजावत कारवाईला सुरुवात केली आहे.

राज ठाकरे यांच्या आदेशनंतर राज्यभरात मनसैनिक आक्रमक झाले आहेत. हिंगोली शहरातील हनुमान मंदिरात आरती करण्यासाठी कळमनुरी इथून काही मनसैनिक निघणार होते. त्यांना कळमनुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काही मनसैनिक मदिना मशिद परिसरात एका हॉटेलमध्ये चहा-पाणी पित होते. याच दरम्यान पोलिसांनी त्यांना गाठलं आणि ताब्यात घेतलं. ही प्रतिबंधात्मक कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here