Raj Thackeray Aurangabad: लाऊड स्पीकर हा सामाजिक विषय, याला जर धार्मिक रंग दिला तर त्याला तसेच उत्तर देऊ: राज ठाकरे

0

औरंगाबाद,दि.1 मे : Raj Thackeray Aurangabad: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये लाऊड स्पीकरवरून पुन्हा अल्टिमेट दिला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा घेत आहेत. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी राज्यभरातून मनसैनिकांनी औरंगाबादमध्ये मोठी गर्दी केली आहे. मला कुणाच्या सणात विष कालवायचे नाही, उद्या 2 मे आहे,परवा 3 मे ईद आहे. 4 मे नंतर मात्र कुणाचेही ऐकले जाणार नाही. लाऊड स्पीकर हा सामाजिक विषय आहे याला धार्मिक रंग देऊ नका. जर याला धार्मिक रंग दिला तर त्याला तसेच उत्तर देऊ. 4 मे नंतर मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगल घडवायच्या नाहीत – राज ठाकरे
लाऊडस्पीकरचा विषय कधी काढायचा नाही का? लाऊडस्पीकर हा काही नवीन विषय नाही. याआधी अनेकांनी हा विषय मांडला आहे आणि मी फक्त त्याला पर्याय दिला आहे. लाऊडस्पीकर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल तर मशिदीबाहेर आम्ही हनुमान चालिसा लावू. महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगल घडवायच्या नाहीत. मुस्लिम समाजाने ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे.

मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून झालेल्या टीकेला राज ठाकरे आपल्या सभेतील भाषणातून उत्तर दिले आहे. सभा होणार, नाही होणार. राज ठाकरे याने सभा घ्यावी नाही घ्यावी, सभेला परवानगी मिळणार नाही मिळणार. ही गोष्ट का केली मला अजूनपर्यंत ही गोष्ट समजली नाही. मी महाराष्ट्रात कुठूनही सभा घेतली असती, तरी तुम्ही दूरदर्शनवरून ही सभा पहिलीच असताना. असे म्हणत राजठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली.

खरं तर मी दोनच सभा घेतल्या. मात्र या दोन सभांवरती किती बोलतायत आहेत. ज्यावेळी ठाण्यातील सभा झाली, तेव्हा दिलीप धोत्रे यांनी मला फोन केला. त्यांनी सागितलं साहेब आपण संभाजीनगरला एक सभा घेऊया. त्यांना मी बोललो सभा घेऊ, तारीख सांगतो. मात्र आता हा विषय फक्त संभाजीनगरपुरता मर्यादित नाही, माझ्या पुढच्या सभा संपूर्ण मराठवाड्यात होणार. तसेच विदर्भात ही जाणार, कोकणात, उत्तर महाराष्ट्रात ही जाणार, पश्चिम महारष्ट्रात ही जाणार. राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार. या सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही. मी कुठेही बोललो तरी ते लोकांना कळणारच आहे, असं औरंगाबादेत मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या भाषणाच्या सुरुवात केली.

कोणत्या ब्राम्हणांची बाजू घेण्यासाठी मी उभा नाही – राज ठाकरे
राष्ट्रवादीच्या सभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही नसायचा. शरद पवार साहेब मी जात मानत नाही. कोणत्या ब्राम्हणांची बाजू घेण्यासाठी मी उभा नाही आणि कोणाचीच बाजू घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्या अठरापगड जातींमध्ये तुम्ही विष कालवले. मतांसाठी कालवले विष शाळा कॉलेजपर्यंत गेले आहे. शाळेत मुले एकमेकांच्या जातीविषयी विचार करु लागली आहेत. यासाठी महाराष्ट्र दिवस साजरा करायचा का?

रामदास स्वामी कधी म्हणाले होते का ते शिवाजी महाराजांचे गुरु आहेत – राज ठाकरे
रामदास स्वामींकडे तुम्ही आता जातीने बघणार आहात? रामदास स्वामी कधी म्हणाले होते का ते शिवाजी महाराजांचे गुरु आहेत म्हणून. गुरु शिष्याच्या नात्याचा कधी संबंध येत नाही. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांविषयी जे लिहिलं आहे त्याच्याइतके उत्कृष्ट लिहिलेल कुठंही वाचलेलं नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here