Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात 5 टप्प्यात पार पडणार मतदान प्रक्रिया

0

नवी दिल्ली,दि.16: Lok Sabha Election 2024: भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत तारखा जाहीर केल्या. यावेळीही सात टप्प्यात मतदान होणार आहे. 4 जून रोजी निकाल  (लोकसभा निवडणुकीचा निकाल) जाहीर केला जाईल . निवडणूक आयोगानेही चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे.

543 जागांसाठी 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 102 जागा, 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात 89 जागा, 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात ९४ जागा, 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात 96 जागा, 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 49 जागा, 25 मे रोजी सहावा टप्पा. 57 जागांवर मतदान होणार असून सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी 57 जागांवर मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान

महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार असून 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. त्यानंतर, देशातील संपूर्ण लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी जाहीर होईल.

पहिला टप्पा  : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर  (विदर्भातील 5)

दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8) 

तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – 11 )

चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड  (एकूण मतदारसंघ – 11 )

पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13 )


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here