Lockdown Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार निर्णय राज्यात lockdown की कडक निर्बंध

0

मुंबई,दि.8: Lockdown Updates: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात पुन्हा एकदा रुग्ण संख्येत वाढ होत आहे. ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांची संख्याही वाढत आहे. अनेक राज्यात मिनी लॉकडाऊन (Mini Lockdown) लावण्यात आला आहे. राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असून याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घेतील असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले होते.

मुख्य सचिव देबशीष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त आणि जिल्हाधिका-यांच्या बैठकीत राज्यभरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात लॉकडाऊन की निर्बंध कडक करायचे याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतरच घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दिल्लीत वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन रात्रीची संचारबंदीसारख्या कठोर उपाययोजनांची चर्चा सुरू आहे. निर्बंधांच्या संदर्भातील एक प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविण्यातही आला होता. मात्र, लॉकडाऊन किंवा निर्बंधांबाबत राष्ट्रीय पातळीवर निकष असायला हवेत, अशी भूमिका राज्याची आहे. त्यामुळे अगदी विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही पंतप्रधानांसोबतच्या चर्चेनंतर अथवा केंद्राकडून स्पष्टता आल्यानंतर घेण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे पुन्हा एकदा ‘ब्रेक द चेन’नुसार निर्बंध लावण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. जेणेकरून गर्दी टाळणे, अनावश्यक कार्यक्रम रोखता येणे शक्य होणार आहे. याशिवाय प्रशासनाला आवश्यक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हानिहाय ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. तसेच मार्चपर्यंत कोरोना निधीची तयारी करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here