Lingayat Mahamorcha: मुंबईत लिंगायत महामोर्चा, आझाद मैदानात उसळला जनसागर

Lingayat Mahamorcha: लिंगायत समाजाकडून जवळपास 22 वेळा मोर्चे

0

मुंबई,दि.30: Lingayat Mahamorcha Mumbai: लिंगायत महामोर्चा |संपूर्ण राज्यभरातून मुंबईच्या आझाद मैदान येथे लिंगायत समाज एकत्र आला आहे. राज्य सरकारच्या विरोधात लिंगायत समाजाने महामोर्चाचे आयोजन केले आहे. लिंगायत समाजाला धर्माची मान्यता मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मुख्य मागण्यांसह इतर आपल्या काही मागण्या घेऊन या आयोजन करण्यात आले.

22 वेळा काढले मोर्चे | लिंगायत महामोर्चा

आधीही याच मागण्यांसाठी लिंगायत समाजाकडून जवळपास 22 वेळा मोर्चे काढण्यात आले होते. मात्र एवढ्या वेळा मोर्चे काढूनही सरकार आपल्याकेड दुर्लक्ष करत असल्याने लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात. त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान येथे लिंगायत समाजाचा महामोर्चा काढण्यात आला आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा, गुजरात आंध्र प्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये लिंगायत बांधव सहभागी झाले आहेत. लिंगायत समाजातील पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी समाजाला अल्पसंख्याक म्हणून स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदने दिले होते. मात्र, अद्याप त्याची दखल घेतली गेली नाही. या मागणीसाठी समाजातील काही संघटना पुन्हा मोर्चाच्या तयारीत असून, मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

लिंगायत महामोर्चा

मागण्या संदर्भात सरकारशी सकारात्मक चर्चा | Lingayat Mahamorcha Mumbai

आझाद मैदान येथे लिंगायत महामोर्चा हजारोंच्या संख्येने मोठ्या उत्साहात मोर्चा पार पडला. या महामोर्चा मध्ये जगद्गुरु चेन्नई बसवानंद महास्वामीजी व अन्य सर्व धर्मगुरू, आमदार विनय कोरे लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय निमंत्रक अविनाश भोसीकर, राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे माधवराव टाकळीकर, सुधीर सिंहासने, प्रदीप बुरांडे, वीरेंद्र मंगलगे, कीर्तीकुमार बुरांडे, रामदास देशिंगे, बी एस पाटील आदी सह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार विनय कोरे यांनी लिंगायत समाजाच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले व खालील मागण्या संदर्भात सरकारशी सकारात्मक चर्चा केली असून ती मान्य करून घेऊ असे मोर्चाला आश्वासित केले. तर त्या 80 टक्के सरकारने मागण्या मान्य केल्यामुळे राज्य सरकारचे अभिनंदन करून लवकरात लवकर अमलात आणावे असे प्रतिपादन राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी केले.

1) लिंगायत समाजाला भाषिक अल्पसंख्यांक म्हणून नवीन विद्यापीठ देणार तसेच लिंगायत समाजाकडून स्थापन करणाऱ्या संस्थांना अल्पभाषिक संस्था म्हणून सरकारचे सर्व अनुदानित उपलब्ध करून देणार.
2) महाराष्ट्र विधानसभेमध्ये जागेचे सर्वे करून महात्मा बसवेश्वर ची पूर्णकृती पुतळाची स्थापना करणार अथवा विधानसभेच्या आत मध्ये महात्मा बसवेश्वर यांचे संपूर्ण तैलचित्र साकारणार.
3) लिंगायत आतील उद्योजकांना उद्योग व्यवसाय वाढीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ याची स्थापना करून कर्जाची उपलब्धता करून देणार.
4) महाराष्ट्रातील गाव तेथे स्मशानभूमी व समाज बांधवांसाठी अनुभव मंटप साठी जागा देणार.
5) मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी जागा व बसव सृष्टी साकार करणार.
6) लिंगायतला संविधानिक स्वतंत्र धर्माचा दर्जासाठी एक अभ्यास गटाची स्थापना करून त्याच्या पूर्ण अभ्यास करून सरकारला अहवाल सादर करणार आहे.

या मोर्चामध्ये अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती लिंगायत धर्म महासभा, महाराष्ट्र वीरशेव महासभा, राष्ट्रीय बसवदल, जागतिक लिंगायत धर्मसभा, बसव ब्रिगेड ते विविध संघटनेने भाग घेतला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here