अदानींमुळे LIC मध्ये गुंतवलेले तुमचे पैसे बुडतील का?

0

मुंबई,दि.२४: LIC: हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. अदानी समूहात ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना प्रचंड तोटा झाल्याचे चित्र आहे. यात वैयक्तीक गुंतवणुकदारांसोबत संस्थात्मक गुंतवणुकदारांचा देखील समावेश आहे. संस्थात्मक गुंतवणुकदारांमध्ये सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती भारतीय आयुर्विमा मंडळाने (LIC) केलेल्या गुंतवणुकीची होय. आता ज्या अर्थी LICने अदानी समूहात मोठी गुंतवणूक केली आहे त्या अर्थी त्यांचे देखील मोठे नुकसान झाले आणि यामुळेच LICची पॉलिसीधारकांमध्ये काळजीचे वातावरण तयार झाले.

LIC ची मोठी गुंतवणूक

LIC ने अदानी ग्रुपमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे आणि अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप सुमारे ११ लाख कोटींवर गेले आहे.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपानंतर एलआयसीच्या गुंतवणुकीवरही चर्चा सुरू झाली. LIC ने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, यामुळे या चर्चा सुरू झाल्या.

एलआयसीच्या गुंतवणुकीच्या मूल्यात घट | LIC News

एका अहवालानुसार, २२ फेब्रुवारी रोजी बाजार बंद झाला तेव्हा, LIC च्या अदानी समूहाच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीचे मूल्य ३३,६३२ कोटी रुपये होते. तर २७ जानेवारीला ते ५६,१४२ कोटी होते. याचा अर्थ एलआयसीच्या गुंतवणुकीच्या मूल्यात आणखी ५०० कोटी रुपयांची घट झाली आहे.

LIC मध्ये देशातील जनतेने केलेली गुंतवणूक किती सुरक्षित आहे, या चर्चा सुरू आहेत. कारण अदानी समूहाच्या कंपन्यांमधील सुमारे १० टक्के हिस्सेदारी विकल्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी गुंतवणुकीचे मूल्य ३०,२२१ कोटी रुपये आहे.

आतापर्यंत एलआयसीकडून गुंतवणूक कमी झाल्याबद्दल कोणतेही विधान आलेले नाही. अशा परिस्थितीत आपला पैसा सुरक्षित आहे का, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे.

याआधीही एलआयसीच्या खासगीकरणानंतर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले होते. यानंतर एलआयसीचा आयपीओ आणला, एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केली त्यांना खूप नुकसान सहन करावे लागले.

एका अहवालानुसार, LIC ला गेल्या ५० दिवसांत ५०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी ग्रुपमध्ये गुंतवलेले कंपनीचे पैसे कंपनीच्या गुंतवणूक मूल्याच्या १ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे एलआयसीचे म्हणणे आहे, पण तरीही याचा अर्थ गुंतवणूकदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे कंपनी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here