बिबट्या फोटोसाठी पोझ देताना कधी पाहिला का? Viral Video

0

मुंबई,दि.20: बिबट्या फोटोसाठी पोझ देताना कधी पाहिला का? सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ (Video Viral) होतात. वन्य प्राणी, वन्य जीवन याविषयी अनेकांना आकर्षण असतं. प्राण्यांच्या जीवनाशी निगडित गोष्टी जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. सोशल मीडियावरही प्राण्यांचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येत असतात. खास करुन प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडीओ. यामध्ये प्राण्यांचा निराळा अवतार आपल्याला पहायला मिळतो. नुकताच बिबट्याचा एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये त्याने आपल्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

बिबट्याचा Video Viral

जंगलात बिबट्याचा वावर पाहून सफारीचे पर्यटकही अवाक् झाले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक बिबट्या रस्त्याच्या कडेने चालला आहे आणि जंगली प्राणी सफारी करणाऱ्यांनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले. अचानक बिबट्याला समोर काहीतरी दिसले आणि तो सावध झाला. सुरुवातीला तो खाली बसतो आणि नंतर पुन्हा त्याच्या पुढच्या पायावर उठतो. काही सेकंदांनंतर, तो आपले पुढचे पाय वर करतो आणि त्याच्या मागच्या पायावर उभा राहतो. बिबट्याचा हावभाव पहायला मिळत आहे. हातात कॅमेरा घेऊन सफारीत आलेल्या लोकांना पाहून तो फोटो काढण्यासाठी पोझ देत असल्याचं म्हटलं जात आहे.

भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी साकेत बडोला यांनी ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “पापाराझींना पाहून सेलिब्रिटीज विमानतळाच्या पोज देताना” दरम्यान, या व्हिडिओने सोशल मीडिया वापरणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. एका वापरकर्त्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, “आगामी ग्लोबल अवॉर्ड शोची तयारी करत असलेल्या बिबट्याच्या पोशाखात एक सेलिब्रिटी होता असं दिसतंय.”

दरम्यान, जंगलात काहीही घडू शकते, येथे भयंकर प्राणी शांतपणे बसलेले दिसतात, कधीकधी ते हल्ला करण्यासाठी धावतात. येणार्‍या धोक्याचा किंवा वन्य प्राण्यांचा नीट अंदाज कोणीही बांधू शकत नाही. कधीकधी वन्य प्राण्यांचे वर्तन कोणालाही आश्चर्यचकित करू शकते. असाच हा व्हिडीओ आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here