लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य

0

मुंबई,दि.14: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी आग्रही आहेत. सगेसोयरे मागणीवरूनही मनोज जरांगे आग्रही आहेत. तर लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन केले होते.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

मनोज जरांगे नावाच्या भुताला बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात फेकून द्या असं वादग्रस्त विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं आहे. मराठा तरुणांच्या आत्महत्येला मनोज जरांगेच जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. तसंच मुख्यमंत्री, गृहमंत्री तुम्ही शिव्या खात असून, हा महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा अपमान आहे असंही ते म्हणाले आहेत. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे.

“जी गोष्ट कधीच मिळणार नाही, जी गोष्ट संविधानाला, कायद्याला अपेक्षित नाही ती गोष्ट तुम्हाला मिळवून देतो ही भाषा आहे. याची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या भूताला वेळीच आवर घातला पाहिजे. हे भूत बाटलीत बंद करावं आणि कुठेतरी अरबी समुद्रात फेकून द्याव. या महाराष्ट्राने कधीही ओबीसी-मराठा वाद पाहिलेला नाही,” असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगता…

पुढे ते म्हणाले की, “त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. शिव्या घालतात, अर्वाच्च भाषेत बोलतात. अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगता आणि सार्वजिनक ठिकाणी शिव्या घालता. कोणत्या कलमांचं भंग होत नाही आहे का? मुख्यमंत्री, गृहमंत्री तुम्ही शिव्या खात आहात. हा तुमचा एकट्याचा नाही तर 12 कोटी जनतेचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत असतील तर तो आमचा अपमान नाही का?”.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here