लखीमपूर हिंसा : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला समन्स, शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी दोघांना अटक

0

दि.8: केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Union Minister Ajay Kumar Mishra) यांचा आरोपी मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी प्रकरणात (Lakhimpur Kheri Case) पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. पोलिसांनी घरावर नोटीस लावली आहे. ही नोटीस मंत्री अजय मिश्रा यांच्या घरी लावण्यात आली आहे. ‘लखीमपूर प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा हजार हो’ केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला आता पोलिसांनी आज सकाळी 10 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे.

दरम्यान लखीमपूर प्रकरणात, (Lakhimpur Kheri Case) पोलिसांनी दोन लोकांना अटक केली आहे, त्यांची नावे लवकुश आणि आशिष पांडे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही एकाच वाहनात होते जे शेतकरी आणि पत्रकार यांना चिरडत गेले. लखीमपूर खेरीचे आयजी लक्ष्मी सिंह यांनी सांगितले की, घटनेनंतर त्यांनी थांबण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी सांगितले की या प्रकरणात एकूण सहा लोकांचा सहभाग समोर आला आहे. ज्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित तीन लोकांनाही चौकशीसाठी बोलावले जात आहे.

काय आहे प्रकरण

लखीमपूर खेरीचे दोन वेळा खासदार राहिलेले आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या मूळ बनबीरपुर गावात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी येणार होते. याचाच विरोध शेतकरी करत होते मात्र यादरम्यानच झालेल्या दंग्यात आठ जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकऱ्यांचाही समावेश होता. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, मिश्रा यांचा मुलगा ज्या एसयूव्हीमध्ये बसला होता, त्याने शेतकऱ्यांना चिरडले आणि त्यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

आशिष मिश्रा यांची पोलीस प्रथमच चौकशी करणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे विरोधकांनी पोलिसांवर हायप्रोफाईल आरोपींना ‘संरक्षण’ दिल्याचा आरोप केला होता. लखनौ झोनच्या आयजी लक्ष्मी सिंह यांनी एनडीटीव्हीला सांगितले, ‘आशिष मिश्रा यांना समन्स जारी करण्यात आले आहे. त्याला लवकरात लवकर चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यूपी पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राला खून आणि निष्काळजीपणाचा आरोपी बनवण्यात आले आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही.

मात्र, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशिष यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी मंगळवारी कबूल केले होते की, लखीमपूर खेरी येथील शेतकर्‍यांना चिरडणारी कार त्यांचीच होती पण ती किंवा त्यांचा मुलगा (आशिष मिश्रा) घटनेच्या वेळी उपस्थित नव्हते. रविवारी लखीमपूर खेरी येथे झालेल्या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here