मुंबई,दि.3: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत. लाडकी बहीण योजने अंतर्गत महिन्याला पात्र महिलांना 1500 रूपये देण्यात येत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरसकट सर्व महिलांना लाभ देण्यात आला.
मात्र निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकारने कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेतील अर्जदारांच्या कागदपत्रांची फेरतपासणी सुरू असून निकष पूर्ण न करणाऱ्या आणि बनावट कागदपत्रं सादर करणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. सोशल मीडियावर पोस्ट करत आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.