क्रांती रेडकर यांनी हॉटेलचा फोटो शेअर करत साधला नवाब मलिक यांच्यावर निशाणा

0

मुंबई,दि.21: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) आरोप करत आहेत. नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी एका बारचे फोटोज शेअर करत त्याचे मालक समीर वानखेडे असल्याचा आरोप केला होता. नवाब मलिकांनी केलेल्या या आरोपावर आता समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

क्रांती रेडकर यांनी ट्विट करत दोन फोटोज पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत नवाब मलिकांनी ट्विट केलेल्या फोटोचा स्क्रिनशॉट आहे जेथे बार असल्याचा दावा केला गेलाय तर दुसऱ्या फोटोत सदगुरू फॅमिली रेस्टॉरंट आणि बार असे लिहिलेलं दिसत आहे. हे फोटो ट्विट करत क्रांती रेडकर यांनी म्हटलं, पुन्हा एकदा फर्जीवाडा… एक जबाबदार पदावर बसलेली व्यक्ती असं कसं वागू शकते?

हेही वाचा ॲड. प्रकाश आंबेडकरांचे समीर वानखेडे यांच्या धर्माबद्दल मोठं वक्तव्य

हेही वाचा महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाला अटक

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 19 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी वानखेडे आणि त्यांच्या वडिलांवर आणखी एक नवा आरोप केला होता. वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असताना त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने दारुच्या दुकानाचा परवाना दिला. संबंधित बारचा परवाना हा 1997 साली जारी करण्यात आला होता. त्यावेळी समीर यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालं नव्हतं, असा दावा नवाब मलिक यांनी केला. तसेच वानखेडे यांनी आपल्या संपत्तीविषयीची खरी माहिती केंद्र सरकारला दिली नाही, असाही आरोप मलिक यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here