Kirit Somaiya: खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार: किरीट सोमय्या

0

मुंबई,दि.15: Kirit Somaiya: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला. किरीट आणि नील सोमय्यांना तातडीनं अटक करण्याची संजय राऊत यांनी मागणी केली. सोमय्यांच्या गैरव्यवहारांची कागदपत्र 3 वेळा ईडी कार्यालयात देऊनही कारवाई झालेली नाही असे संजय राऊत म्हणाले. निकॉन इन्फ्रा कंस्ट्रक्शन कंपनी कुणाची? ही कंपनी किरीट सोमय्यांची असून ते राकेश वाधवान यांचे पार्टनर आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. पीएमसी बँक घोटाळ्याचा आरोपी राकेश वाधवान याच्याशी किरीट सोमय्यांचे आर्थिक संबंध असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान याचा थेट भाजपाशी आर्थिक संबंध, भाजपाला 20 कोटी रुपये दिले असेही संजय राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं. ट्वीटच्या माध्यमातून किरीट सोमय्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर आरोप करणारे संजय राऊत कोविड सेंटर घोटाळ्याबाबत का बोलत नाहीत असाही सवाल त्यांनी विचारला आहे.



भाजप नेते किरीट सोमय्या ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “2017 साली सामनातून अशाच प्रकारे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये माझी पत्नी प्रा डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. आता माझ्या मुलाचे नाव घेतलं आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध 10 खटले दाखल केले आहेत तर अजून तीन तीन खटले पाईपलाईनमध्ये आहेत. मला त्यांची परिस्थिती समजते. मी आणखी एका प्रकरणाचं स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. कोणत्याही भ्रष्ट व्यवहारात गुंतलेलो नाही.”

माझ्यावर आरोप करणारे संजय राऊत कोविड सेंटर घोटाळ्याबाबत का बोलत नाहीत असाही सवाल त्यांनी विचारला आहे. प्रवीण राऊत, सुजीत पाटकर यांच्याशी राऊतांचा काय संबंध? असा सवाल विचारत ठाकरे सरकारच्या घोटाळ्याविरुद्ध आमचा लढा सुरुच राहणार असंही स्पष्ट केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here