भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील या मंत्र्याला बॅग भरून ठेवण्याचा दिला सल्ला

0

पुणे,दि.१ एप्रिल २०२२: भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्यातील मंत्र्याला बॅग भरून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. लवकरच त्यांना तुरुंगात जावे लागेल असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी तुरुंगात जाण्याचा पुढील क्रमांक राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा असल्याचं म्हणत त्यांनी लवकर बॅग भरावी, असा खोचक सल्ला दिलाय. किरीट सोमय्या यांनी आज पुण्यातील आयकर सदनला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

किरीट सोमय्या म्हणाले, “आता तुरुंगात जाण्याचा पुढील क्रमांक चिट्ठीत आपोआप अनिल परब यांचा आला आहे. अनिल परब यांच्याविरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात अनिल परब किती खोटारडे आणि लबाड मंत्री आहेत हे समोर आलं.”

“मी ३० तारखेला गेलो तेव्हाही मुलाखत दिली होती की माझा रिसॉर्टशी काहीही संबंध नाही. नरेंद्र मोदी सरकारने दापोली कोर्टात केस केली. त्यात सर्व पुरावे दिलेत. म्हणून आता अनिल परब यांनी लवकर बॅग भरावी,” असा इशारा सोमय्या यांनी अनिल परब यांना दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here