Kiran Gosavi Aryan Khan: किरण गोसावीने याकरिता आर्यन खान सोबत काढला होता फोटो

0

मुंबई,दि.1 Kiran Gosavi Aryan Khan: शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यामध्ये आर्यन आणि इतर पाच जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे, त्यांची नावे आरोपपत्रात नाहीत. त्याचाच अर्थ आर्यनला NCB ने क्लीन चिट दिली आहे.

आता आर्यन खानला पकडले तेव्हाचा पहिला व प्रचंड व्हायरल झालेल्या फोटोमागचे रहस्य समोर आले आहे. याचसोबत आर्यन खान कोणासोबत फोनवर बोलत होता, त्याची देखील माहिती समोर आली आहे.

पंच असलेल्या किरण गोसावीने (Kiran Gosavi) आर्यन खानला (Aryan Khan) पकडलेले तेव्हा त्याच्यासोबत सेल्फी काढला होता. त्याचबरोबर किरण गोसावीने कोणला तरी फोन लावून दिला होता, त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.

यावर एनसीबीच्या एसआयटीने किरण गोसावीची (Kiran Gosavi) पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये जाऊन चौकशी केली. यामध्ये किरण गोसावीने आर्यनचा सेल्फी का घेतला आणि फोनवर कोणाशी बोलणे करून दिले याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांना दिली आहे.

एनसीबीने न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये याचा उल्लेख आहे. २ ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा मारला होता. त्यानंतर किरण गोसावी आर्यन खानसोबत दिसत होता. त्यानेच आर्यन खानला पळत पळत एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणले होते. आपल्या मित्रांना दाखविण्यासाठी आर्यन खानसोबत सेल्फी काढला होता, असे उत्तर किरण गोसावीने दिले आहे.

आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नव्हते. परंतू तो आर्यन खान असल्याचे समजल्यावर लोक घोळका करतील म्हणून त्याला घेऊन इतरांपासून बाजुला बसलो होतो. तेव्हा आपण आपल्या मित्रांना दाखविण्यासाठी सेल्फी काढल्याचे किरण गोसावी म्हणाला.

याचबरोबर फोनवर बोलतानाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला, त्यावर देखील किरण गोसावीने एनसीबीला स्पष्टीकरण दिले आहे. या व्हिडीओवरून एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्याला किंवा शाहरुख खानला फोन लावण्यात आल्याची चर्चा होती. परंतू किरण गोसावीने आपल्या एका मित्राला आर्यन खानचा आवाज ऐकायचा होता, त्याला फोन लावून दिलेला असे उत्तर दिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here