खेडगी परिवाराने केले लाखांहून अधिक लाडू वाटप

0

अक्कलकोट,दि.९: तेलंगणातील  श्रीक्षेत्र श्रीशैलम येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही अक्कलकोटच्या खेडगी परिवाराने सलग पंधरा तास सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांना लाडू वाटप करून  प्रसाद वाटपाची परंपरा कायम ठेवली आहे.

मागील ६० वर्षापासून खेडगी परिवाराकडून हा उपक्रम दरवर्षी अखंडपणे राबवला जातो. कै. चनबसप्पा खेडगी, मातोश्री निलव्वाबाई खेडगी यांनी अगदी कठिण परिस्थिती मध्ये सुरु केलेला हा समाजाभिमुख  उपक्रम अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन शिवशरण खेडगी यांनी देखील अखंडपणे सुरू ठेवला होता. आणि आता माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी यांच्या मार्गदर्शनाखाली  बसलिंगप्पा खेडगी आणि परिवाराच्यावतीने या उपक्रमाचे नियोजनबध्द आयोजन करण्यात येत आहे. 

मंगळवारी रात्री बारा वाजता सोलापूरच्या शेकडो भाविकांच्यावतीने ‘श्री’ ची पूजा, आरती करून महाप्रसादचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी ‘श्री मल्लिकार्जुन महाराज की जय’ चा जयजयकार करण्यात आला. त्यानंतर शोभा खेडगी व बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते भाविकांना लाडू वाटपास सुरुवात करण्यात आले. हा लाडू वाटप मंगळवारी सायंकाळी पर्यंत म्हणजे १५ तास पर्यंत चाललेला होता. 

यासाठी महादेवी धोडमनी, पवित्रा खेडगी, सिध्दम्मा कलशेट्टी, विजयालक्ष्मी यळमी, चन्नवीर खेडगी, स्तुती खेडगी, कालिदास कोळी, भारत पाटील, देवानंद कवटगी, गुंडू कांदे, बसय्या स्वामी, श्रीशैल इचगे, रावसाहेब तेगेहळ्ळी, गुरुनाथ कलशेट्टी, परमेश्वर कलशेट्टी, मुत्तण्णा वाले, बसवराज स्वामी, सुरेश पेडसंगी, परमेश्वर कलबुर्गी, विजयकुमार माळाबागी, हणमंत कोळी आदिसह बसलिंगप्पा खेडगी मित्र मंडळानी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here