Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

0

उत्तराखंड,दि.18 : Kedarnath Helicopter Crash: उत्तराखंडमधील (Uttarakhand) केदारनाथमध्ये (Kedarnath) हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात 6 जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका खासगी कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे.

उत्तराखंडमधील (Uttarakhand) केदारनाथपासून (Kedarnath) 2 किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टी येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये 6 जण असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन कंपनीचं हेलिकॉप्टर केदारनाथहून परतत होतं. त्याचवेळी हा अपघात झाला. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तो केदारनाथ धामचा जुना मार्ग होता. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये सहा जण होते. त्यापैकी या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मदत आणि बचावकार्यासाठी पथकं रवाना झाली आहेत. केदारनाथमध्ये दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं असावं असा अंदाज वर्तवला जात आहे.अपघाताचा बळी ठरु शकतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here