काटगावकर फसवणूक प्रकरण: 40 लाखांच्या वस्तुंचा लिलाव करून रक्कम कोर्टात जमा करण्याचा आदेश

0

सोलापूर,दि.16: काटगावकर फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर काटगावकर यांच्या बांधकाम उपयोगी व गृहोपयोगी वस्तूच्या दुकानातील एकूण 40 लाखांच्या वस्तूच्या जाहीर लिलाव करून लिलावातून आलेली रक्कम न्यायालयात जमा करावी असा आदेश विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी पारित केला.

मे. हरिओम फायनान्स,मे रिध्दी सिध्दी फायनान्स, नवरत्न फायनान्स, कमर्शियल फायनान्स या फायनान्सव्दारे हजारो गुंतवणूकदारांकडून जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवी गोळा करून 45 कोटी पेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी भरलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायालयात सुरू आहे.

यातील मुख्य आरोपी शेखर काटगावकर याची इंद्रायणी इंटरप्रायझेस या नावाची गृहोपयोगी वस्तू तसेच रुद्र स्टील, रुद्र मशनरी व ईझी किचन हया नावाची बांधकाम वस्तु विक्रीची फर्म आहे. या सर्व फर्ममधील वस्तू या गुंतवणुकदारांनी गुंतवलेल्या रक्कमेतुन घेतलेल्या असलेने पोलिसांनी जप्त केलेल्या होत्या. त्या सर्व वस्तू जाहीर लिलावाव्दारे विक्रि करून ती रक्कम न्यायालयात जमा करणेस परवानगी मिळावी असा अर्ज विशेष सरकारी वकिल ॲड. संतोष न्हावकर यांनी न्यायालयात दाखल केलेला होता.

त्यावर युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील ॲड. संतोष न्हावकर यांनी गुंतवणुकदारांची गुंतवणूक संरक्षित होण्यासाठी सर्व वस्तुची विक्री करून ती रक्कम न्यायालयात जमा करणे ठेवीदारांच्या हिताचे आहे असे न्यायालयाचे निदर्शनास आणुन दिले.सदरचा युक्तिवाद मान्य करुन एकून 40 लाख किंमतीच्या सर्व वस्तू सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निकम व पोलिस निरीक्षक आर्थीक गुन्हे शाखा यांनी परस्पर सहकार्याने व समन्वयाने जाहीर लिलावाव्दारे विक्री करून आलेली रक्कम न्यायालयात जमा करावी व तसा अहवाल लवकरात लवकर दयावा असा आदेश पारीत केला.

यात सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संतोष न्हावकर तर आरोपी तर्फे ॲड. शशी कुलकर्णी हे काम पहात आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here