एका वेश्येकडेही एवढे नंबर्स नसलीत, मग हे धनंजय मुंडे नेमकं बोलतात कुणाशी: करुणा शर्मा

0

दि.१: करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका वेश्येकडेही एवढे नंबर्स नसलीत, मग हे धनंजय मुंडे नेमकं बोलतात कुणाशी असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध आहेत. तसेच याबाबतची सीडी आपण बाहेर काढली तर संपूर्ण महाराष्ट्र हादरेल, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.

धनंजय मुंडे (Dhananajay Munde) वेगवेगळ्या मोबाईल नंबर्सवरून का बोलतात. एका वेश्येकडेही एवढे नंबर्स नसलीत, मग हे मुंडे नेमकं बोलतात कुणाशी. मी खंडणी मागते असा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता. मात्र मीच धनंजय मुंडे यांना एक कोटी रुपये दिले आहेत. त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनाही पैसे दिले आहेत. मात्र आज माझ्यावर सोनं विकून घर चालवण्याची वेळ आली आहे. माझ्याकडेही काही सीडी आहेत. त्या लावला तर अख्खा महाराष्ट्र हादरेल असा दावाही करुणा शर्मा यांनी यावेळी केला.  

मी धनंजय मुंडेंवर आरोप करत नाही आहे तर प्रत्येक गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत. धनंजय मुंडेंचे एक दोन नाही तर अनेक महिलांशी अनैतिक संबंध आहे. माझ्याकडे माझी बहिणी आणि धनंजय मुंडेंच्या संबंधांचेही फोटो व्हिडीओ आहेत मात्र ते मी समोर आणणार नाही, कारण त्यात धनंजय मुंडेंप्रमाणेच माझी बहिणही आक्षेपार्ह स्थितीत आहे. मला असा पती नकोय. मी त्याचं कधीच पिंडदान केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here