PF Nomination अपडेटसाठी अवघे काही दिवस शिल्लक

0

दि.25: PF Nomination: PF खातेदारांना 31 डिसेंबरपूर्वी ई नामांकन करावे लागणार आहे, अन्यथा नंतर मोठी समस्या निर्माण होईल. पीएफ खातेदारांना नॉमिनीचे नाव ॲड ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे.

EPFO नॉमिनी (PF Nomination) संबंधित माहिती अपडेट करण्यासाठी अवघे सात दिवस शिल्लक आहेत. नॉमिनी अपडेटची डेडलाईन 31 डिसेंबरला संपणार आहे. तुम्ही नॉमिनी तपशील विहित वेळेत अपडेट न केल्यास अनेक सुविधांवर पाणी सोडण्याची वेळ येईल. यामध्ये पेन्शन तसेच इश्युरन्स सारख्या सुविधा समाविष्ट आहेत. पीएफ नोंदणीकृत व्यक्तिच्या मृत्यूनंतर केवळ नॉमिनीकडे पीएफ अकाउंटमधून पैसे काढण्याचे अधिकार असणार आहेत.

पीएफ खातेधारकांना यापुढे नॉमिनीचे नाव ॲड करण्यासाठी ऑफलाइन केंद्रांना भेट देण्याची गरज नाही. सदस्य हे काम ऑनलाइनही करू शकतात. याशिवाय, EPFO PF खाते वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात अनेक नामांकित व्यक्तींची नावे ॲड करण्याची परवानगी देते. याशिवाय कोणत्या नॉमिनीला किती शेअर मिळावा हे सदस्य निवडू शकतात.

हेही वाचा PF खातेदारांना 31 डिसेंबरपूर्वी करावे लागणार हे काम, अन्यथा नंतर मोठी समस्या होईल निर्माण

नॉमिनी अपडेट करणे किंवा नव्याने जोडण्याचे आॕनलाईन स्वरुपात केले जाऊ शकते. यासाठी केवळ UAN नंबर असणे आवश्यक ठरणार आहे. तसेच आधार क्रमांक अकाउंट क्रमांकाला संलग्नित असणे अनिवार्य आहे.

EDLI स्कीमला नो एंट्री:
यंदाच्या वर्षी मे महिन्यात EPFO ने EDLI म्हणजेच एंप्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्सची मर्यादा 7 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. EDLI योजनेनुसार पीएफ नोंदणीकृत व्यक्तीची मृत्यू झाल्यास नॉमिनीला एकरकमी ही रक्कम प्राप्त होते. दरम्यान, पीएफ नोंदणीकृत व्यक्ती सेवेत असणे आवश्यक आहे.या योजनेनुसार किमान विमा रक्कम 2.5 लाख रुपये आहे.

असे करा PF Nomination

–EPFOच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://www.epfindia.gov.in/site_en/index.php

-‘लॉग-इन’ नंतर पाहा (View) पर्यायावर जा

-प्रोफाईल वर क्लिक करा

-तुमच्यासमोर दिसणारी सर्व माहिती पडताळा

-व्यवस्थापित करा (Manage) पर्यायावर जा

-ई-नॉमिनेशन पर्यायावर क्लिक करा

-आवश्यकतेप्रमाणे तपशील भरा

-माहितीपूर्ण भरल्यानंतर अस्वीकरणचा पर्यायावर क्लिक करा. कौटुंबिक तपशीलाचे पान उघडले जाईल

-नॉमिनीचे नाव,पत्ता, संपर्क, वय, बँक तपशील,नातेसंबंध, फोटो याप्रमाणे माहिती सादर करा.

-तुम्ही एकाधिक नॉमिनी जोडू इच्छित असल्यास (Add new) वर क्लिक करा

-संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘सेव्ह करा’ वर क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here