Jitendra Awhad: काहींना आपण मागासवर्गीय आहे, हे सांगायची लाज वाटते: जितेंद्र आव्हाड

0

ठाणे,दि.१३: Jitendra Awhad: ओबीसी जनगणना आणि आरक्षण यासाठी मला लढावे लागणार आहे असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र (Jitendra Awhad) आव्हाड म्हणाले. काहींना आपण मागासवर्गीय आहे, हे सांगायची लाज वाटते असे ते म्हणाले. कुत्र्यांची, अन्य पशू-पक्ष्यांची जनगणना होते. मात्र, ओबीसी (OBC Reservation) समाजाची स्वतंत्र गणना होत नाही. आरक्षण हा दारिद्र्य निर्मुलनाचा कार्यक्रम नाही. शोषितांना आरक्षण मिळाले, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर महाराष्ट्रात का नाही, अशी विचारणा जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. 

महात्मा फुले कार्लमार्क्सपेक्षा एक इंचही कमी नव्हते. आपल्याकडे ३५४ जाती आहेत. अनेक जातीचे लोक इथे आले. मी स्वतःच ओबीसी आहे, मी राजकारण केले नाही. पण, ओबीसी जनगणना आणि आरक्षण यासाठी मला लढावे लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वांत जास्त डोक्यावर छप्पर नाही, ते आदिवासी आणि भटके आहेत. काहींना आपण मागासवर्गीय आहे, हे सांगायची लाज वाटते. आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीबाबत ओळख नाही हे दुर्दैव आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. 

आरक्षण

शिक्षण, नोकऱ्या आरक्षणाचा मुद्दा आहे. पण, आता नोकऱ्याच कुठे राहिल्या आहेत, ज्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. मात्र, आरक्षण काढल्याने ११ लाख लोकांची पदे गेली, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भगवाबाबत अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सलाम करतो. मी त्यांना मानतो ज्यांनी जिजाऊ ला सती जाऊ दिले गेले नाही. शिवाजी महाराजांकडे जास्तीत जास्त ओबीसी समाज होता. आपल्या पिढ्या काही शिकल्या तर आपण पुढे जातो आणि जात विसरतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे मी इथे आहे. माझे वडील कधी गावी गेले नाहीत. माझी आई लॅमिंटन रोडला भाजी विकायची. दोघांनी प्रचंड कष्ट केले. आमच्याकडे शेतीही नव्हती. सुमारे २२ वर्ष माझे वडील सीएसटी स्टेशनला झोपत होते. आई-वडिलांनी खूप कष्ट सोसून मला मोठे केले. गरिबी काय असते ते मी पाहिले आहे. आता गरिबांसाठी काही कामे हातात घेतली आहेत, असे जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.
 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here