संभाजीराजे छत्रपतीबाबत दावे प्रतिदावे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले

0

मुंबई, दि.२९: राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhaji Raje) यांच्या बद्दल केल्या जाणाऱ्या दावे प्रतिदावे बाबत स्पष्ट बोलले. संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडी व भारतीय जनता पार्टीत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही असे म्हटले होते. शिवसेनेने संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तरच राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल असे म्हटले होते. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश नाकारला, त्यामुळे शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही यावर भाष्य केले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी चालली, भाजपच्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीला ते हजेरी लावायचे, मात्र शिवसेनेचे शिवधनुष्य त्यांना चालले नाही, हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल, असे राऊत म्हणाले.

शाहू छत्रपती (Chhtrapati Shahu Maharaj) म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना काढली. त्यामुळे स्वत:च्या बळावर पुढे जाणे किंवा इतर पक्षाचा पाठिंबा घेणे हे दोन पर्याय संभाजीराजेंकडे होते. मागील वेळी राष्ट्रपती नियुक्त खासदारकी घेतानाही आम्ही त्यांना ती घेऊ नये असं मत मांडले होते. परंतु त्यांनी वैयक्तिक तो निर्णय घेतला. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी राजकीय जी पाऊले उचलली आहेत. त्यात कुठेही आमच्याशी अथवा घरच्यांशी चर्चा केली नाही. यात छत्रपती घराणं कुठे येत नाही. त्यामुळे हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे असं म्हणता येणार नाही असा खुलासा त्यांनी केला आहे. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हे विधान केले. 

संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती (Chhtrapati Shahu Maharaj) यांनी संभाजीराजेंबाबत मोठं वक्तव्य केलं होते. संभाजीराजेंनी (Yuvraj Sambhaji Raje) २०१६ मध्ये राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्यासाठीही आमचा विरोध होता. २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्यानंतर त्यांचा पराभव झाला. त्यानंतरची वाटचाल ही व्यक्तिगत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला वैयक्तिक जगण्याचा अधिकार आहे. मला किंवा छत्रपती घराण्याला कुठलाही निर्णय विचारून घेतला नाही. मी कधीही त्यांना विरोध केला नाही. आतापर्यंत जे निर्णय घेतले ते व्यक्तिगत आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शाहू महाराज या नावातच सगळे आले, अशी प्रतिक्रिया मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांना छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे सूचक विधान केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण गेल्या आठ वर्षांत असे एकही काम केलेले नाही, की ज्यामुळे लोकांचे डोके शरमेने खाली जाईल, असे विधान केले होते. यावर, हे खरे आहे की मोदींनी कोणतेही असे काम केले नाही की देशाची मान शरमेने खाली जाईल, किंबहुना कोणत्याही पंतप्रधानाने असे काम केलेले नाही, सत्तर वर्षांच्या इतिहासात देशाची मान कायम ताठ राहील असेच काम प्रत्येक पंतप्रधानाने केले आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here