बोकडांना समारंभपूर्वक बळी दिले जाते, सिंहांना नाही; जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट चर्चेत

0

सोलापूर,दि.३१: ईडीने संजय राऊत (Sanjay Raut) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट केले. त्यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे.

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला होता. संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली आहे. मुंबई पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर शिवसेनेचे ४० आमदार गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या अनेक आमदार व खासदार यांची ईडी चौकशी सुरू होती. अनेकांनी या कारवाईला घाबरून भाजपा बरोबर जाणे पसंद केल्याचे बोलले जाते. संजय राऊत हे भाजपा विरुद्ध आक्रमकपणे लढा देत होते.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “गमावलेले हक्क अन्याय करणाऱ्या लोकांच्या विवेकबुद्धीला आवाहन करून परत मिळत नसतात, तर सतत संघर्षाने मिळतात. बोकडांना समारंभपूर्वक बळी दिले जाते, सिंहांना नाही! – डॉ. बाबासाहेब आंबेडकर”

संजय राऊत हे महाविकास आघाडीचे सरकार असताना आक्रमकपणे राज्य सरकारच्या बाजूने तर केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडत होते. संजय राऊत यांनी यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात उपराष्ट्रपतींना पत्र लिहून आपल्यावर सरकार पाडण्याचा दबाव टाकण्यात येत आहे असे म्हटले होते. हेही वाचा Sanjay Raut: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतीनां पत्र लिहून केला खळबळजनक दावा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here