Jio 5G : रिलायन्स जिओ (Reliance Jio) देशातील एक हजार शहरांमध्ये 5जी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी तिच्या 5G नेटवर्कवर आरोग्यसेवा आणि औद्योगिक ऑटोमेशनची चाचणी करत आहे. 5G नेटवर्कवर डेटा वापर जास्त असेल म्हणून कंपनी उच्च वापर क्षेत्रे आणि ग्राहक ओळखण्यासाठी हिट मॅप्स, 3 डी मॅप्स, आणि रे ट्रेसिंग तंत्रज्ञान वापरत आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार मजबूत नेटवर्क तयार करणे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाही निकालात ही बाब समोर आली आहे.
जिओने ग्राहक आधारित नेटवर्क बनविण्यासाठी जिओने अनेक टीम तयार केल्या आहेत. ज्यांना भारतात तसेच अमेरिकेत तैनात करण्यात आले आहे जेणेकरून ते विविध प्रकारचे 5G तंत्रज्ञान विकसित करू शकतील. कंपनीला विश्वास आहे की या टीम असे 5G सोल्यूशन्स तयार करतील जे तांत्रिक स्तरावर जगाच्या बरोबरीचे किंवा चांगले असतील. याशिवाय, कंपनीने युरोपमध्ये एक टेक्नॉलॉजी टीम देखील तयार केली आहे जी 5G ची तयारी करेल.
कंपनी 5G च्या जलद कार्यरत करण्यासाठी पायाभूत सुविधांचा झपाट्याने विस्तार करत आहे. त्या ठिकाणी फायबर आणि विजेची उपलब्धताही वाढवली जात आहे. जेणेकरून जेव्हा 5G सुरु करण्याची वेळ येईल तेव्हा त्यात कोणताही व्यत्यय किंवा विलंब होणार नाही.
रिलायन्स जिओचा ARPU (म्हणजे प्रति ग्राहक प्रति महिना सरासरी महसूल) देखील वाढला आहे. दरमहा प्रति ग्राहक एआरपीयू 151.6 रुपये झाला आहे. जिओ नेटवर्कवरील प्रत्येक ग्राहकाने दरमहा 18.4 जीबी डेटा वापरला आणि सुमारे 901 मिनिटे बोलले.