झारखंड: भूतबाधाच्या नावाखाली मौलानाने केली 14 वर्षीय मुलीला मारहाण, उदबत्तीने दिले चटके

0

चतरा,दि.3: झारखंडच्या (Jharkhand) चतरा जिल्ह्यात भूतबाधा (Exorcism), सांगत मौलानाने 14 वर्षांच्या आजारी मुलीला मारहाण केली आणि तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी उदबत्तीने चटके दिले. मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. चतराचे पोलिस अधीक्षक राकेश रंजन यांनी सांगितले की, ही घटना लावलॉंग ब्लॉक मुख्यालयातील कोलकोले पंचायतीच्या संभे गावातील आहे. या घटनेप्रकरणी आरोपी मौलाना मोहम्मद वाहिद (35) याला अटक करण्यात आली आहे.

होळीच्या वेळी सांभे गावातील मुलीची प्रकृती खालावली होती, असे त्यांनी सांगितले. मंत्राने भूतबाधा दूर करून तब्येत बरी करण्याचा दावा मौलानाने केला. मुलीच्या पालकांनी आरोप केला आहे की आरोपींनी तिला निर्दयीपणे मारहाण केली आणि शरीराच्या अनेक ठिकाणी उदबत्तीने चटके दिले. पोलिसांनी सांगितले की, मुलीला गंभीर अवस्थेत रांची येथील रिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

एसपींनी सांगितले की, आरोपी अब्दुल वाहिदला अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here