Jayant Patil On Pankaja Munde: पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर जयंत पाटील म्हणाले…

0

सोलापूर,दि.2: Jayant Patil On Pankaja Munde: पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली आहे. दोन दिवसापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी भाजपवरील ही नाराजी व्यक्त केली. काल दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष माझा थोडीच आहे. भीती वाटणं हे आमच्या रक्तातच नाही. आम्ही कुणाला घाबरतच नाही, काही मिळालं नाहीतर मी ऊसतोडीसाठी जाईन, असं वक्तव्य मुंडे यांनी केलं. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

जयंत पाटील म्हणाले… | Jayant Patil On Pankaja Munde

जयंत पाटील म्हणाले, आमचे अनेक सहकारी भाजपमध्ये गेले आहेत, त्यामुळे त्या लोकांना कुठे बसवायचे हा प्रश्न राहिला आहे. त्यामुळे निष्ठावंत मागे ढकलले गेले आहेत. पंकजा मुंडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर बोलताना पाटील म्हणाले, जर आणि तर या प्रश्नाला कधीच उत्तर देऊ नये. ज्यावेळी जर होईल त्यावेळी आम्ही तरचे उत्तर देऊ. 

शिंदे गटातील पक्ष प्रवेशावर म्हणाले…

शिंदे गटातील पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात मोठ्याप्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. गृहपक्षांना राजीनामा देऊन मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. यावरून पत्रकारांनी जयंत पाटलांना (Jayant Patil) प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल टिप्पणी दिली.

“शिंदे गटात गेलेले काही लोक आताच मला भेटले. त्यांनी आताच अर्धातासापूर्वी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. शिंदे गटात गेलेले आहेत ते तात्पुरते गेले आहेत. शिंदेंची सत्ता आहे, शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सोयी सवलती मिळत असल्याने लोक तिथे जात आहेत. त्यामुळे तिथे गेलेल्या लोकांसाठी आम्ही काही बोलत नाही. एका कार्यकर्त्याने सांगितलं की सहा महिने जातो, निधी आणतो आणि परत येतो. महत्त्वाच्या कार्यकर्त्याने अशी परवानगी मागितली. नगरपालिकेत निधी येणं गरजेचं आहे. मी जाऊन या म्हटलं”, असं म्हणत जयंत पाटील मिश्किल हसले.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे? | Pankaja Munde

गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. आता पुन्हा एकदा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काल एका कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी भाजपवरील ही नाराजी व्यक्त केली. काल दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष माझा थोडाच आहे. भीती वाटणं हे आमच्या रक्तातच नाही. आम्ही कुणाला घाबरतच नाही, काही मिळालं नाहीतर मी ऊसतोडीसाठी जाईन, असं वक्तव्य मुंडे यांनी केलं. पंकजा मुंडे  यांच्या या वक्तव्याने त्या भाजपने नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.   


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here