दि.२८: Jayant Patil On Sujay Vikhe Patil: राष्ट्रवादी शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपा खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे (BJP) खासदार सुजय विखे पाटील (sujay vikhe patil) यांनी “राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस ही जेवणापुरती आलेले वऱ्हाडी” असे म्हणत महाविकास आघाडी सरकारचं (Maha Vikas Aghadi) वर्णन केले होते. नवऱ्यानं दुसरी सवत आणू नये म्हणून शिवसेना मूकपणे अन्याय सहन करीत आहे, तर कितीही तिरस्कार केला तरी जेवणासाठी वऱ्हाडी म्हणून आलेली काँग्रेस हटायला तयार नाही’, अशा शब्दांत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( sujay vikhe patil ) यांनी महाविकास आघाडी सरकारचं वर्णन केलं होते.
भाजपा खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडीवर (MVA) खोचक शब्दांमध्ये टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. याचबरोबर, द काश्मीर फाईल्स चित्रपटावरूनही त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
“ नवरा, बायको, पाहुणे अशा बिरुदावल्या आमच्यातल्या सगळ्यांना ते देत आहेत, पण षंढाना काय बिरुदावली द्यायची? षंढ हे या कुठल्याच भूमिकेत नसतात. त्यामुळे त्यावर मी काही जास्त बोलत नाही.” असं जयंत पाटील यांनी आज रत्नागिरीत माध्यमांसमोर बोलून दाखवलं.
“महाविकास आघाडी कोणावरही दबाव टाकत नाही. वेगवेगळ्या एजन्सी येतात आणि आमच्या सरकार मधल्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे काम चालू आहे. भाजपा आणि वेगवेगळ्या एजन्सी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राचे सरकार पाडण्यासाठी साम,दाम, दंड याचा उपयोग केला जात आहे.” असा आरोपही यावेळी जयंत पाटील यांनी केला.
याचबरोबर द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर बोलताना जयंत पाटील यांनी, “चित्रपट येतात आणि जातात, पण प्रामुख्याने एखादा चित्रपट खांद्यावर घ्यावा, त्याचा प्रचार करावा आणि त्याचं मार्केटींग करावं हे सगळं अनाकलनीय आहे. सात वर्षे सत्ता भोगूनही तुम्हाला काश्मीर फाईलच्या निर्मात्याच्या पायाशी का जावं लागतं?” असा सवाल जयंत पाटील यांनी मोदी सरकारला उद्देशून केला आहे.